कोरोनामुळे अगोदरच शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असतानाच त्यात परतीच्या पावसाने आणखी भर टाकली आहे. राज्य सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिल्यामुळे कांद्याच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले असताना आता सामान्यांना कांद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे वाढलेल्या महागाईमुळे नागिरक चिंतेत आहेत.
तसेच आता दर वाढल्यामुळे गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले आहे असे मीडियानं सांगू नये, अश्यात कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका. जर परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी अमरावती मध्ये केलं आहे.
दरम्यान, कांद्याच्या मागणीत अचानक वाढ झाल्यामुळे लवकरच कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.