महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिल्यानंतर ऑनलाईन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अॅमेझॉन कंपनी आपल्या ग्राहकांसाठी मराठीच भाषेत सेवा देणार असल्याचे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर मनसेने आपला मोर्चा इंडियन प्रीमियर लीगकडे वळवला आहे. यासंबंधी मनसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीलाही पत्र पाठवलंय.
“आयपीएलचं समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कन्नड आणि बंगाली भाषेमध्ये उपलब्ध आहे. मात्र अॅपमध्ये मराठीचा पर्याय देण्यात आलेला नाही. आयपीएल पाहणारा सर्वात मोठा प्रेषक वर्ग हा मराठी आहे”. असे मनसेच्या कामगार सरचिटणीस केतन नाईक यांनी आपल्या ट्विटरद्वारे हे पत्र शेअर केले आहे.
If it can be in Telugu, Tamil, Kannada and other regional languages then why not in Marathi?
Make sure that you also introduce Marathi commentary during ipl t20 matches on Hotstar.#iplinmarathi @IPL @hotstar_helps @DisneyPlusHS @rayantec @StarSportsIndia pic.twitter.com/LGCZRH8s9k— Ketan Naik (@ketannaik4) October 20, 2020
आयपीएल संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या, नाहीतर खळ्ळखट्याक पद्धतीने आंदोलन करु, या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल’, असा इशारा मनेसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्राद्वारे दिला आहे.
वाचा – मनसेच्या मराठी प्रेमाची अमेझॉन कडून दखल…