काल शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन संघात सामना पार पडला. चेन्नईसाठी हा सामना करो या मरो असा होता. मात्र चेन्नईची फलंदाजी मुंबईच्या भेदक गोलंदाजी समोर पूर्णपणे गारद झाली
आयपीएल २०२० च्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज संघ प्लेऑफ मधून बाहेर पडला आहे. चेन्नईने आपल्या ३ धावांतच ४ विकेट्स गमावल्या होत्या. पॉवर प्लेमध्येच चेन्नईचा निम्मा संघ तंबूत जाताना दिसला.
सॅम करनने मात्र चेन्नई कडून फलंदाजी करत उत्कृष्ट कामगिरी बजावत अर्धशतक झळकावले. यामुळे चेन्नईला ९ बाद ११४ धावाच करता आल्या. जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहरने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या तर ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
क्विंटन डिकॉक ४६ धावा तर इशान किशनने ६८ धावा काढत मुंबई संघाला विजय मिळवून दिला. महत्वाचे म्हणजे मुंबई संघाने गोलंदाजी प्रमाणेच फलंदाजीत देखील उत्कृष्ट कामगिरी केली आणि एकही विकेट न गमवता सामना विजयी केला.
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर होता पण कायरन पोलार्डने संघाची धुवा सांभाळत उत्तम रित्या कर्णधाराची भूमिका निभावली. हा सामना जिंकून मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२० च्या पॉइंट टेबल मध्ये १४ गुणांसह अव्वल स्थानावर गेली आहे.