कोरोना बाधितांना कमी किंमतीत रेमडिसिव्हर हे औषध उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने औषधाचे दर निश्चित केले आहेत. खासगी रुग्णालयात रेमडेसिव्हर इंजेक्शन २,३६० रुपयांत उपलब्ध होणार आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रेमडिसिव्हर इंजेक्शन मोफत उपलब्ध आहे. परंतु, खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्यांना रुग्णांना हे इंजेक्शन महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठया प्रमाणावर येत होत्या. याची दखल घेऊन राज्य शासनाने त्याचे दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला.
२,३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वाजवी किंमतीत आणि वेळेवर हे इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, यांनी याबाबतची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
इंजेक्शनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयाने त्याबाबत प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रेस्क्रीप्शन, रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, आधार कार्ड, तसेच रुग्णाची वैद्यकीय माहिती देणे आवश्यक आहे.