काबूलमध्ये शनिवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटामध्ये १८ लोक ठार त्याचबरोबर शाळकरी मुलांबरोबर ५७ जण जखमी झाले आहेत. हा स्फोट काबूलमधील पश्चिमेकडील दश्त-ए-बर्ची या शियाबहुल येथील शैक्षणिक केंद्राबाहेर झाला.
ADVERTISEMENT
हल्ल्यासाठी हल्लेखोर आत जात असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवलं होतं त्यावेळी त्यांनी स्फोट घडवून आणला. याबाबत माहिती अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक अरियन यांनी दिली.
दोन वर्षांपूर्वी देखील अशा प्रकारची घटना घडली होती त्यावेळी त्याची जबाबदारी आयसिसशी जोडल्या गेलेल्या एक संघटनेने घेतली होती. मात्र या स्फोटाची अद्याप कोणीही जबाबदारी घेतली नाही, तालिबानचा या स्फोटाशी संबंध असल्याचं म्हटलं जात आहे.
ADVERTISEMENT