काल शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत पार पडला. यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला, यात त्यांनी अभिनेत्रा कंगना रानवतचा देखील जोरदार टिका केली.
“ज्यांना आपल्या राज्यात योग्य आहारही मिळत नाही, ते येथे येतात, पैसे कमवतात आणि मग मुंबईची तुलना पीओकेशी करतात आणि राज्याचे, नेते आणि पोलिस विभागाची बदनामी करतात. आपल्या सर्वांना मुंबई पोलिसांचा अभिमान आहे” अश्या शब्दात कंगनावर टिका केली
मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी. जनतेचे सेवक असताना तुम्ही क्षुल्लक गोष्टीवरून संघर्ष करत आहात. तुमच्याकडे असणारी सत्ता त्याचा वापर करून तुम्ही तुमच्याशी सहमत नसलेल्यांविरूद्ध त्यांना हाणी पोहोचवण्यासाठी करत आहात, असं उत्तर दिले आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1320602881351839745
मुख्यमंत्री देशाचं विभाजन करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कोणी बनवलं, हे लोकांचे सेवक आहेत. यांच्यानंतर त्या ठिकाणी दुसरा कोणतातरी व्यक्ती असेल. मग ते महाराष्ट्र स्वत:च्या मालकिचा असल्यासारखं का वागत आहेत, असा सवालही कंगणाने केला आहे.