मागच्या काही महीन्यात कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. आजपर्यंत जवळपास 70 लाख कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, मात्र भारतासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. मागच्या 24 तासांत 50,129 एवढे नवे रुग्ण आढळले आहेत आणि त्याचबरोबर देशाचा रीकव्हरी रेट हा 90% एवढा वाढला आहे. याबाबत माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या 78,64,811 एवढी असून त्यातील 6,68,154 एवढे रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. तर महाराष्ट्रात आजपर्यंत 14,55,107 रुग्णांची नोंद झाली आहे आणि यापैकी 43,152 रुग्ण दगावले आहेत.
मात्र या सर्वात भारताने कोरोनाला आटोक्यात आणण्याबाबत चांगलं ध्येय गाठलं आहे. कोरोनाचा आलेख देखील आता उतरता झाल्यामुळे लोकांनी निःश्वास टाकला आहे.