वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ऊसतोड कामगारांच्या आंदोलनाला पाठींबा देत २१ ऑक्टोंबर रोजी ऊसतोड मेळाव्याचे आव्हाहन केले होते. त्यावरून २५ ऑक्टोंबर रोजी बीड जिल्ह्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा पार पडला. हा मेळावा ७ ऊसतोड कामगार संघटना, वाहतूकदार, बैलगाडी चालक व मुकादम यांनी आयोजित केला होता.
“ऊस कामगारांनी त्यांचं आंदोलन सुरुच ठेवावं. आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची संधी चालून आली आहे. सध्या ऊसतोड मजुराला 1 टन ऊसामागे 238 रुपये मिळतात. तर आणि हार्वेस्टिंग मशीनला 400 रुपये देता. मुकादमाला कमिशन डबल करा. यांचा बोजा कारखान्यावर पडणार नाही कारण 20 टक्के इथेनॉल तयार केलं तर त्याचं नुकसान होणार नसल्याचे” प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
मुख्यमंत्री यांना आवाहन करत सगळी बोर्ड बरखास्त करा आणि नवीन बोर्डाचं इलेक्शन घ्या. आमच्या सोबत बसा आणि करारनामा करा. करारनामा हा सरकार आणि कारखानदार यांच्यासोबत झाला पाहिजे. हा लढा यशस्वी करण्यासाठी ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार यांनी करारनामा झाल्याशिवाय एकानेही गाडीत बसू नका, असे देखील प्रकाश आंबेडकर मेळाव्यात म्हणाले.
तसेच हा तुमचा मतदारसंघ आहे तुम्ही ऊसतोड कामगारांची अवस्था पाहावी आणि निर्णय घ्यावा, अशी विनंती पंकजा मुंडे यांना प्रकाश आंबेडकरांनी केली.