मुंबई | शिवसेनेच्या दसरा मेळावा कास पार पडला. यात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यात त्यांनी अभिनेत्री कंगनावर देखील जोरदार टिका केली.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय म्हणाले ?
‘रामानं रावणाचा वध केला. आपणही प्रातिनिधीक स्वरूपात रावणाचा वध करतो. हा रावण दहा तोंडांनी महाराष्ट्रावर आलेला आहे. रावणाचं एक तोंड म्हणतंय, मुंबई पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे. महाराष्ट्र मुंबई पोलीस निकम्मे आहेत. ते काही काम करत नाहीयेत. इकडे सगळे नशिले आहेत. ही कसली रावणी औलाद.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, काश्मीर \मध्ये अधिकृत 1 इंच जमीन तरी तुम्ही आज घेऊन दाखवा आणि मग आमच्या अंगावर या, घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत. मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची अश्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी कंगणाचा समाचार घेतला. ‘लोकशाहीने दिलेले हे अधिकार उद्धव ठाकरे माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाहीत. तुमची टुकार भाषणं तुमच्या अकार्यक्षमतेचा पुरावा आहेत,’ अशी टीकाही तिनं केली आहे.
याला प्रत्यूतर देण्यासाठी कंगनाने ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. “मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कुणी बनवलं? हे फक्त जनतेचे सेवक आहेत. यांच्या आधीही कुणीतही होतं. लवकरच हे जातील आणि त्यांच्या जागी राज्याची सेवा करण्यासाठी दुसरं कुणीतरी येईल. ते महाराष्ट्राचे मालक असल्यासारखं का वागत आहेत?,” असं कंगनानं म्हटलं आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1320619622484209664
‘संजय राऊत मला हरामखोर म्हणाले आणि उद्धव ठाकरे ‘नमक हराम’ म्हणत आहेत. मुंबईनं आश्रय दिला नसता तर मला खायला मिळालं नसतं असं ते म्हणतात. मी तुमच्या मुलाच्या वयाची आहे. स्वत:च्या हिंमतीवर मोठ्या झालेल्या महिलेबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांना काहीतरी वाटलं पाहिजे,’ असंही तिनं म्हटलं आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1320602881351839745