हरियाना | फरीदाबादमध्ये सोमवारी एका २० वर्षीय मुलीची दिवसाढवळ्या गोळी मारून हत्या करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही मुलगी बी.कॉम फाइनल ईयरचा पेपर देऊन वल्लभगढ़ अग्रवाल कॉलेज मधून बाहेर पडली होती. त्या वेळी दोन अज्ञात व्यक्तीं गाडीमध्ये येऊन तिला गोली मारून फरार झाले.
हा सगळा प्रकार जवळील सीसीटिव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला. जखमी झालेल्या मुलीला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु वेळ निघून गेल्याने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सीसीटिव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेल्या माहितीनुसार दोन अज्ञात व्यक्ती या मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु मुलीने विरोध केल्या कारणाने त्यांनी तिला गोळी मारली गेली. यातील तौसीफ़ या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
२०१८ मध्ये देखील तौसीफ़ने या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर मुलीच्या कुटुंबाने याची तक्रार नोंदवली होती. परंतु काही दिवसांनीच त्यांनी ती तक्रार मागे घेतली. या घटनेप्रकरणी मुलीच्या वडिलांनी आरोपींना लवकर पकडून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असून हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आले आहे.
“मुले या अगोदर ही माझ्या मुलीच्या मागे येत होते. यानंतर आम्ही त्या मुलांना समजावून सांगितले होते. काल माझी मुलगी पेपर देण्यास कॉलेजला गेली. ती निघताच तौसीफ़ याने पूर्ण तयारी केली होती. जशी ती पेपर देऊन बाहेर आली मुलांनी तिला गाडीत बसण्यास जबरदस्ती केली ती नाही म्हणली म्हणून तिला गोळी मारली. ” असे मुलीच्या वडिलांनी पोलिसांशी बोलताना सांगितले आहे.