बीड | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथे भगवान भक्ती गडावर ऑनलाईन दसरा मेळावा आयोजित केला होता, या कारणाने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पंकजा मुंडे यांच्यासह आणखीन 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यानंतर त्यांनी “गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे,” असं ट्वीट करत पंकजा मुंडेंनी संताप व्यक्त केला आहे.
अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 26, 2020
पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथे ऑनलाईन दसरा मेळावा घेतला होता. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या महादेव जानकर, खासदार भागवत कराड यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन दसरा मेळाव्या दरम्यान पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतंही सोशल डिस्टन्स पाळलं नाही. यामुळे आपत्ती व्यवस्थापना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 25, 2020
“परवानगी घेऊन गेले असतानाही गुन्हा दाखल झाला आहे. आधी माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आता तेच सत्र माझ्यापर्यंत आलं आहे.” असं पंकजा मुंडे यांनी ट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत.