पाकिस्तान येथील पेशावरमध्ये मदरशात सकाळी भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाले असल्याचे वृत्त डॉन या वृत्तवाहिनीने दिलं आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारली नाही.
پشاور کے مدرسے میں ہونے والے دھماکے میں 70 سے زائد افراد زخمی ہوئے، ہسپتال ذرائع#Peshawar #Blast #DawnNews #Pakistan pic.twitter.com/fyPmq5HEZ4
— DawnNews (@Dawn_News) October 27, 2020
जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या लेडी रिंडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अज्ञात व्यक्तीने मदरशामध्ये एक बॅग ठेऊन गेला. असा अंदाज असल्याची माहिती पोलिस अधिकारी वकार अझीम यांनी एएफपीला दिली आहे.
तसेच या स्फोटात लहान मुले ठार झाले असण्याची शक्यता आहे असं रॉयटर्सला वृत्तसमुहाला एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. सध्या जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमींना तात्काळ उपचार दिली जात असून रुग्णालयाचे संचालक स्वत: आपातकालीन विभागात हजर असल्याची माहिती दिली आहे.