पिस्तुल्या, सैराट, फॅन्ड्री या सिनेमांचे राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे हे तार या आगामी लघुपटामधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
यात नागराज एका पोस्टमनच्या मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना दिसतील. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक पंकज सोनवणे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून तारचं पोस्टर शेअर केलं आहे.
पोस्टरमध्ये नागराजनं एका पोस्टमनचा गणवेश परिधान केला असून, सायकल घेऊन चालत जाताना आपल्याला दिसत आहे.
फिल्मचं सादरीकरण रितेश देशमुखच्या “मुंबई फिल्म कंपनीनं” केलं आहे. नागराजसोबत फिल्ममध्ये भूषण मंजुळे, भूषण हंबे, विवेक जांभळे, पूजा डोळस या कलाकारांचाही अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे.