नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये अनलॉक-५ ची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, ती वाढवून नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले आहे. गृहमंत्रालयाने घोषित केलेल्या अनलॉक-५ प्रक्रियेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन चित्रपटगृहे तसेच स्विमिंग पुल खुले करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच राज्यातील शाळा १५ ऑक्टोबर नंतर सुरू करण्याचे आदेश शैक्षणिक संस्थांना दिले आहे, मात्र राज्यांनी आपापल्या ठिकाणाच्या परिस्थितीनुसार याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. राज्यांतर्गत व्यक्ती आणि वस्तूंच्या वाहतुकीवर कोणतीही बंधने नसणार आहेत, असे गाईडलाईन्स मध्ये म्हटले आहे. मात्र कंटेनमेंट झोन’ मध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत कडक लॉक डाऊन असेल.
दरम्यान कोणतेही राज्य सरकार किंवा केंद्र शासित प्रदेश कंटेनमेंट झोनच्या बाहेर जाऊ शकत नाही. असेही या गाईडलाईन्स मध्ये म्हटले आहे.