मुंबई – करोना संसर्ग आटोक्यात येत असल्याने राज्य सरकारही हळूहळू लॉकडाऊनचे नियम शिथिल करत आहे. राज्य सरकारने सर्व महिला, वकील, सुरक्षा रक्षकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. अशातच सर्वसामान्यांनाही लोकल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले आहेत.
सर्वसामान्य मुंबईकरांना रोज ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. यामुळे एका प्रवाशाने ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. ‘महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणे खूप मोठा अन्याय आहे, असे ट्विट त्या व्यक्तीने केले.
Dear Sir @CMOMaharashtra @OfficeofUT
Earlier Women allowed to travel in Mumbai Locals. Now Lawyers allowed too. Why disallow businessmen employees common man❓ Its BIG INJUSTICE to block @mumbairailusers in Diwali season.@PiyushGoyal @AUThackeray @VijayWadettiwar @DrSEShinde pic.twitter.com/TeaiOEe3Qd
— M. K. Ludhwani (@m_ludhwani) October 27, 2020
यावर उत्तर देताना मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ. यासंबंधी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल, असे सकारात्मक संकेत त्यांनी दिले आहेत.
विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली होती. यावेळी उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांना खुली करण्यावर सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी करोनाच्या परिस्थितीत टप्प्याटप्प्याने लोकांना प्रवासाची परवानगी द्यावी, अशी सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली.