बुधवारी आयपीएलचा ४८ वा सामना झाला. हा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघात झाला. प्रथम नाणेफेक जिंकून मुंबई संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ४ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करत मुंबई इंडियन्स संघाने १९.१ षटकातच ५ विकेट्स गमावत १६६ धावा करत सामना जिंकला. या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने ४३ चेंडूत सर्वाधिक ७९ धावा केल्या. तर जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मुंबई संघाच्या उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी च्या कामगिरीमुळे संघाला आणखी २ गुणांचा फायदा झाला. आता मुंबई इंडियन्स १६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर गेली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर फलंदाजी मध्ये देवदत्त पडिक्कलने चांगली कामगिरी केली. त्याने सर्वाधिक ७४ धावा काढल्या. हा सामना जिंकून मुंबई इंडियन्स संघाने प्लेऑफच तिकीट निश्चित केलं आहे. प्लेऑफ मध्ये जाणारी मुंबई ही पहिलीच टीम ठरली आहे.