खिलाडी कुमार अक्षयचा “लक्ष्मी बॉम्ब” हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. हा वाद शांत करण्यासाठी निर्मात्यांनी सिनेमाच्या नावातील बॉम्ब हा शब्द काढून सिनेमाचं नाव “लक्ष्मी” असं असणार आहे. ९ नोव्हेंबरला डिजनी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच वादात अडकलेला होता. ट्रेलर रिलीज होताच अनेक ट्विटर युजर्सनी हा सिनेमा “लव्ह जिहाद” ला प्रोत्साहन देत आहे, असं म्हटलं होतं. राघव लॉरेन्स दिग्दर्शित हा सिनेमा गुरुवारी सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी पाठविण्यात आला होता. तिथं निर्मात्यांमध्ये चर्चा झाली आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन शबीना खान, तुषार कपूर, अक्षय कुमार यांनी सिनेमाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला.
सिनेमाच्या ट्रेलरचं सर्वांनीच कौतुक केलं आहे. आमिर खाननेही ट्विट करत “प्रिय अक्षय कुमार, जबरदस्त ट्रेलर, माझ्या मित्रा हे पाहण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. हा सिनेमा हिट होणार आहे, सिनेमा सिनेमागृहामध्ये प्रदर्शित व्हायला हवा होता. तुझी कामगिरी उत्कृष्ट आहे. सर्वांना शुभेच्छा.”
https://twitter.com/aamir_khan/status/1316669451366932480