अमेठी | येथे एका सरपंचाच्या पतीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडीत व्यक्ती गावातील एका उच्चवर्णीय कुटूंबाच्या आवाराच जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचाराआधीच पिडीताचा मृत्यू झाला आहे.
अमेठी जिल्हातील बंदुहिया गावाच्या सरपंच छोटका यांचे पती अर्जुन गुरुवारी संध्याकाळी गावातील चौकात चहा पिण्यासाठी गेलेले, मात्र तिथून ते परतलेच नाही, छोटका यांच्या म्हणण्यानुसार, गावातील कृष्ण कुमार तिवारी तसेच त्यांच्या चार साथीदारांनी अर्जुन यांचं अपहरण करून त्यांना जिवंत जाळलं आहे. याआधी ही अनेक वेळ कृष्ण कुमार यांना मारण्याची धमकी दिल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
यासंबंधी पिडीत महिला सरपंचानं गावातील पाच व्यक्तींवर पतीला जिवंत जाळण्याचा आरोप केलाय. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलीय.
अर्जुन यांच्या कुटुंबीयांनी जळालेल्या अवस्थेतच दवाखान्यात नेताना त्यांचा जबाब मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. यामध्ये त्यांच्या पतीने अर्जुन यांच्यासह पाच आरोपींच्या उल्लेख केला आहे. के के तिवारी, आशुतोष, राजेश, रवि आणि संतोष असं या आरोपींची नावं आहेत. पिडित कुटुंबीयांच्या आरोपानुसार, पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केलाय.
महत्वाच्या बातम्या – गुजरात मधील योजनांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण…
मराठमोळ्या ऋतुराजची दमदार खेळी!
मुंबई पोलिस दलाचे हायकोर्टाकडून कौतुक!