पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यास शुक्रवारी सुरुवात झाली. यावेळी मोदींनी नर्मदा जिल्ह्यातील केवडीया येथे जंगल सफारी सरदार पटेल प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन केले. यावेळी प्राणी संग्रहालय आणि पक्षी शाळेचा दौराही त्यांनी केला.
या दौऱ्यात मोदींनी सर्वात आधी माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहिली. पक्षी शाळेत पोपटांसोबत मोदींनी काही वेळ घालवला. त्यांनी पोपटांना काहीवेळ हातावर खेळवलेही. मार्चमध्ये कोरोनाचे संकट आल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच गुजरात दौरा आहे.
नंतर मोदींनी एकता मॉलचे उद्घाटन केले, तसेच लहान मुलांसाठी च्या न्यूट्रिशन पार्कचंही लोकार्पण केले. दरम्यान मोदी शनिवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी स्टॅच्यू ऑफ युनिटी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
दरम्यान मोदींनी १७ एकरातील आरोग्य वनाचे उद्घाटन केले. भारतातील समृद्ध आकर्षक पुष्प परंपरा आणि वनस्पती या आरोग्य वनांमध्ये आहेत. येथे पाच लाखाहून अधिक औषधी वनस्पती आहेत, 17 एकर परिसरात हे वन पसरले आहे. गोल्ड आर्ट वरून मोदींनी या संपूर्ण वनाला फेरफटका मारला, तसेच येथील सेल्फी पॉइंटचे ही उद्घाटन केले.