मुंबई | देशात कोरोना काळाच सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई शहरात होते. तरी कोरोना काळात मुंबई पोलिसांनी कौतुकास्पद काम केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे कौतुक केले. कोरोना काळात अनेक पोलीस दबावाखाली काम करीत आहेत, त्यामुळे त्यांनाही जनतेचे सहकार्य मिळावे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने सुनावणी करताना हे सांगितले.
जगातील सर्वाधिक उत्तम पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांची गणना केली जाते. त्यामुळे नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे असल्याचे न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. न्या. शिंदे म्हणाले, आधीच मोठ्या तणावाखाली असताना देखील महामारीच्या काळातील कठीण समयी मुंबई पोलिसांचे काम हे खूपच अवघड बनले होते. पोलीस अधिकारी सातत्याने काम करीत होते. सुनैना होले यांच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान खंडपीठानं मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.
सुनैना होले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजूकर सोशल मिडियावर पोस्ट केला होता. यासाठी विविध कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याची सुनावणी हायकोर्टात सुरु असताना खंडपीठानं मुंबई पोलिसांबाबत निरिक्षण नोंदवलं. गुरुवारी ही केस सुनावणीसाठी आल्यानंतर वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, होले या बीकेसी पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिलेल्या नाहीत त्या पोलिसांना सहकार्य करीत नाहीत. यावर न्या. शिंदे म्हणाले, मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्तम मानले जाते. त्यांची कामगिरी उत्तम असून मुंबई पोलिसांना देखील जनतेने सहकार्य केले पाहिजे.
दरम्यान, होले यांना २ नोव्हेंबरपूर्वी पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी निश्चित केली.
त्याचबरोबर खंडपीठाने होले यांना २ नोव्हेंबरपूर्वी पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे आदेश देऊन पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी निश्चित केली.
महत्वाच्या बातम्या – गुजरात मधील योजनांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण…
मराठमोळ्या ऋतुराजची दमदार खेळी!