मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वीजबिला संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात चर्चेत असलेल्या वीजबिलांच्या प्रश्नावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांची ही भेट घेऊ असेही राज ठाकरे म्हणाले होते.
सरकारविरोधी सूर घेऊन आलेल्या कोणत्याही व्यक्तीचं राज्यपाल अगदी मनापासून स्वागत करतात. उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांकडे आपले प्रश्न मांडण्याची एक नवीनच पद्धत रूढ झाली आहे. वीज बिलासंबंधित मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला. पण लोकांचे प्रश्न सुटत नसल्यामुळेच राज्यपालांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांची भेट घेता आली नसती का? या प्रश्नाचं उत्तर देताना देशपांडे म्हणतात, “मुख्यमंत्र्यांकडे जाऊन काही कामच होत नाहीत ना.”
आम्ही एवढ्या सगळ्या लोकांना भेटलो, याची माहिती मुख्यमंत्र्यांना असेलच पण मुख्यमंत्र्यांनी याबाबत काहीच पाऊल उचललं नाही. ते फेसबुकवर बोलतात, पण हिंमत असेल तर सरकार पाडा, या पलीकडे ते जात नाहीत. वीजबिलाबाबत सरकारने गंभीर असलं पाहिजे. हा लोकांच्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहे.” राज्यपालांना भेटण्याआधी मनसेने अजित पवार, उर्जामंत्री नितीन राऊत, उर्जा विभागाचे सचिव, महासंचालक, वीज कंपनीचे संचालक अदानी यांचीही भेट घेतली होती. या सर्वांना भेटूनही कामे होत नसल्यामुळे अखेर राज्यपालांकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही देशपांडे म्हणाले. या दरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला का? या प्रश्नाचं उत्तर देणं, देशपांडे यांनी टाळलं
यावर “वेळ आली तर मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊ, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे, तसंही राज्यपालांना भेटण्यात गैर काहीच नाही , शिवाय राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली, असे राज ठाकरे यांनी ट्विटर वरून सांगितले.
वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली. pic.twitter.com/N6zSuYX9ed
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 29, 2020
महत्वाच्या बातम्या – गुजरात मधील योजनांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण…
मराठमोळ्या ऋतुराजची दमदार खेळी!
मुंबई पोलिस दलाचे हायकोर्टाकडून कौतुक!
युपीत दलित सरपंचाच्या पतीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना!