फरिदाबाद | गेल्या काही दिवसांपूर्वी हरियानामधील फरीदाबादमध्ये दिवसाढवळ्या एका विद्यार्थिनीची गोळी घालून हत्या केली होती. हा सगऴा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्ती या मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत होते. परंतू मुलीने विरोध केल्या कारणाने तिला गोळी मारली गेली.
घडलेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी तैासिफ आणि रेहान या आरोपींना अटक केली होती. यानंतर या आरोपींना लवकर फाशीची शिक्षा करण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी रविवारी सर्व समाजाची महापंचायत बोलवण्यात आली होती. परंतु या पंचायतीला वेगळे वळण मिळाले.
या मागणीसाठी फरिदाबाद-वल्लभगढ महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. पोलिसांनी जमलेल्या जमावाला हटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. तसेच वाहनांचीही तोडफोड केली. हिंसक झालेल्या जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
महापंचायत सुरू असताना राष्ट्रीय महामार्गावर कायदा व सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच महापंचायत आयोजित करण्यासाठीही परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती पोलीस उपआयुक्त सुमिर सिंह यांनी दिली.