मुंबई | कोरोना पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली मुंबई लोकल १ नोव्हेंबर पासून आपल्या फेऱ्यात वाढ करणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई लोकल आता ६१० अधिक फेऱ्या वाढवणार आहे. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवरील सध्याच्या ७०६ फेऱ्यांत आणखी ३१४, तर पश्चिम रेल्वेवरील ७०४ फेऱ्यांमध्ये २९६ फेऱ्यांची भर पडणार आहे. यामुळे या दोन्ही मार्गावर मिळून एकूण २०२० फेऱ्या होणार आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेवर २९६ फेऱ्या वाढणार असून यातील ७६ फेऱ्या सकाळी गर्दीच्या वेळी आणि ५१ फेऱ्या सायंकाळी गर्दीच्या वेळी धावणार आहेत. सध्या ६ महिला विशेष लोकल फेऱ्यांत आणखी ४ फेऱ्या, तर वातानुकूलित लोकलच्या १० फेऱ्यात २ फेऱ्यांची भर पडेल.
या वाढीव फेऱ्यांत सर्वाधिक ६५ फेऱ्या विरार-अंधेरीदरम्यान, ४३ फेऱ्या विरार ते बोरिवलीदरम्यान आणि ४२ फेऱ्या बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावतील. लॉकडाऊन अगोदर मुंबई ट्रेनने ८० लाख लोक प्रवास करत होते. परंतु कोरोना काळात हा आकडा कमी होऊन सध्या २२ लाखावर आला आहे. तर मुंबई ट्रेनच्या दोन्ही मार्गावर पूर्वी ३,१४१ लोकल फेऱ्या धावत होत्या.
महत्वाच्या बातम्या – देशात आजपासून होणार “हे” नवीन बदल!
महाराष्ट्रातील मंत्री घालणार आज काळ्या पट्ट्या!