सोनी लिव्हवरील the scam 1992-द हर्षद मेहता स्टोरी सर्वात जास्त ट्रेडिंग वेबसिरीज बनली आहे. जवळपास ९.८ इतकं आय. एम. बी. रेटिंग सिरीजला मिळालेलं आहे. यामुळे जगभरात ही सिरीज ट्रेंड आहे. या स्टोरीचा बेस पुर्णपणे हर्षद शांतीलाल मेहता (प्रतीक गांधी) ह्याच्याभोवती आहे. भारताने १९९१ ला मुक्त अर्थव्यवस्था स्विकारली, हा काळ हा पुढं-पुढं सरकत होता, याच काळाच्या ओघात गुजराती कुटुंबातील पोरगा हर्षद मेहता एक दिवस शेअर मार्केटिंगचा “द बिग बुल” बनला. ही सिरीज सुचिता दलाल यांनी लिहिलेल्या “the scam” या पुस्तकावर आधारलेली आहे.
सामान्य माणसांची स्वप्न तशी फार मोठी वगैरे नसतात. जरी त्यांनी मोठी स्वप्न पाहिली तर, त्यात गैर असं काहीच नाही. हर्षदनं सुद्धा असंच एक स्वप्न पाहिलेलं शेअर मार्केटिंगमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून स्वतःचं नाव करायचं. हे स्वप्न सत्यात उतरत ही, पण सत्यात उतरताना आजूबाजूची बदलत जाणारी परिस्थिती खूप विदारक बनतं जाते. याच चित्रण दिग्दर्शक हंसल मेहता यांनी उत्तमप्रकारे केलं आहे.
शेअर मार्केटिंगच गणित सर्वसामान्यांन नेहमीच किचकट वाटत आले आहे. इथं प्रत्येक सेकंदाला शेअर्स वर जातात आणि खाली येतात आणि तितक्याच शक्कलीने हे गणित जुळवणारा हर्षद आपल्याला पाहिला मिळतो. शेअर मार्केटिंग समजून घेण मुळात कठीण आहे. खूप कमी वेळेत हर्षद शेअर मार्केटिंग शकतो. प्रत्येक वेळेला पडणारे फासे आणि हळूहळू वाढत राहणारा पैसा, यामुळं त्याची प्रतिमा शेअर मार्केटिंगमधला “द बिग बुल” अशी बनते.
शेअर मार्केटिंगमधला द बिग बुल इतरांना मात्र खटकतो. त्याची दिवसागणिक वाढणारी श्रीमंती, गाडी, बंगला अस अफाट वैभव इतरांच्या डोळ्यात (शेअर मार्केटिंगमधले इन्वस्टर) सतत खुपत राहत. हर्षदच्या व्यवहारात होणारी अफरातफर म्हणजेच एक प्रकारचा “आर्थिक घोटाळा”! बाहेर आणण्याच काम एक नामक पत्रकार सुचिता दलाल करते. तसं पाहायला गेलं तर या साऱ्यात एकटा हर्षद नाहीये, तर इतरही खूप सारे लोक आहेत. फरक एवढाच आहे की, हर्षद यात सापडलाय.
वेबसिरीजमधले काही डायलॉग सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहेत. “रिस्क है तो इश्क है”, “सिगरेट तो में पिता नही, पर हमेशा अपने पास लाइटर रखता हूं, धमाका करने के लिए”
सिरीज हर्षद मेहता या व्यक्तीचे व्यक्तिचित्रण म्हणावी लागेल. सुटाबुटात सर्वत्र वावरणारा आणि फडाफड इंग्लिश बोलणारा हर्षद मेहता आपल्याला दिसतो. वेबसिरीज पाहताना असंख्य प्रश्न आपल्याला पडतात, काहींची उत्तरही मिळतात पण काही प्रश्न मात्र तसेच राहतात. यासाठी वेबसीरिज पाहणं सोईस्कर ठरेल.
८०, ९० चा काळ दाखवण्यासाठी वापरलेले “व्ही एफ एक्स” कथेला पूरक ठरतात. स्कॅम हे खूप प्रकारच्या आहेत. पण the scam 1992 हर्षद मेहता स्टोरी मुळातच आर्थिक घोटाळ्याची देशातल्या मोठ्या घोटाळ्यांपैकी एक मानली जाते.
प्रतीक गांधीने रंगवलेला हर्षद मेहता आणि श्रेया धन्वंतरी साकारलेली सुचिता दलाल ह्या दोघांनी आपापल्या भूमिका चोख बजवलेल्या आहेत. एका चाळीत राहणाऱ्या गुजराथी पोरानं एक स्वप्न पाहिल आणि ते सत्यात उतरविण्याचा प्रवास एकदा तरी पाहण्यासारखा नक्कीचं आहे.
नक्की वाचा – न थांबणारा झंझावात “मिर्झापूर”