ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये १९९९ पासुन “नो शेव्ह नोव्हेंबर” ही मोहीम चालवली जाते. दरवर्षी जगभरात ‘वर्ल्ड बिअर्ड अँड मुस्टॅश कॉम्पिटिशन’ ही स्पर्धा नोव्हेंबरच्या काळात घेतली जाते. यातुनच ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ ही संकल्पना उदयास आली आहे. यात जगभरातले ‘दाढीप्रेमी’ सहभागी होतात.
भारतात देखील मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. या प्रकारातूनच दाढीच्या नवनव्या फॅशन आणि त्यांची नावेही रूढ झाली आहेत. दाढीच्या अस्सल भारतीय प्रकारांनाही देसी लूक, बिअर्ड बाबा अशी खास नावे देत अनेकांनी हे प्रकार फॉलो केले आहेत. अनेक भारतीय दाढीप्रेमी या मोहीमेत सहभाग होत आहेत. यात सहभागी होणाऱ्यांनी आपल्या ३ मित्रांना देखील यात सहभागी होण्याचे आवाहन केले जाते.
We’re just 3 days away from dropping the razor! You don’t have to grow it alone. Tag 3 friends that should join you in the ~hairy~ fun. pic.twitter.com/voLAy8bFua
— No-Shave November (@No_Shave) October 29, 2020
भारततील अनेक पुरुष हा ट्रेंड फॉलो करतात. या ट्रेंड सोबतच या तरुणांनी सामाजिक बांधीलकी जोपसण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. कोल्हापूरच्या काही तरुणांनी ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहीम सुरू करून त्यातूनवाचणारे पैसे हे कर्करोगग्रस्त व्यक्तींच्या उपचारासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. गेले 3 वर्ष हे तरुण ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहिमेतून कर्करोग रुग्णांसाठी निधी गोळा करत आहेत.
वेब सिरीज पाहण्याच्या सवयीमुळे कुणालने वाचवले ७५ लोकांचे प्राण