आपल्या वादग्रस्त विधानामुळे अभिनेते मुकेश खन्ना हे नेहमीच चर्चेत असतात. या अगोदर त्यांनी कपिल शर्मा शोवर काही दिवसांपूर्वी टीका करत शोमध्ये हजेरी लावण्यास नकार दिला होता. यानंतर अक्षय कुमारच्या आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या शिर्षकावर देखील त्यांनी आक्षेप घेतला होता. आता सोशल मिडियावर मुकेश खन्ना यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते मीटू चळवळी बद्दल या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
Actor turned right wing rabble rouser Mukesh Khanna says women going out to work and thinking of being equal to men is cause of #metoo pic.twitter.com/1sZ37GudTy
— Hindutva Watch (@Hindutva__watch) October 30, 2020
या व्हिडीओमध्ये ते महिलांनी घराबाहेर पडल्यामुळे समस्या निर्माण होतात असे म्हटले आहे. ‘महिलांचे काम आहे घर सांभळणे. सध्याच्या घडीला महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या गोष्टी करतात. पण मी सांगू इच्छितो की समस्या येथूनच सुरु होतात. याचा सर्वात पहिला परिणाम कोणावर होत असेल, तर तो घरातील लहान मुलांवर. आईचे प्रेम त्यांना मिळत नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान सध्या सोशल मिडायावर त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे.