कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशभरात अनलॉक प्रक्रीया सुरु झाली आहे. यामुळे देशात १ नोव्हेंबर पासुन काही नवीन बदल होणार आहेत.
काय होणार बदल ?
गॅस सिंलिंडरची डिलीव्हरी आता ओटीपी शिवाय होणार नाहीत. सिलेंडर डिलीव्हरीची प्रकीया पुर्णपणे ऑनलाईन करण्यात येणार आहे. घरी आलेल्या डिलीव्हरी बॉयला ओटीपी देऊनच सिलेंडर घ्यावे लागणार,
देशातील सर्व रेल्वेते वेळापत्रक बदलणार आहे. यात ३० मुख्य राजधानी गाड्यांचे वेळापत्रक देखील बदलणार आहे.
SBI बॅंकेच्या बचत खात्याचे व्याज दर 0.२५ % कमी होणार आहे. यामुळे SBI बॅंकेच्या बचत खात्याला आता ३.२५ % एवढे व्याज मिळणार आहे.
बॅंक ऑफ बडोदा आजपासुन जास्तीचे ट्रांझाक्शन शुल्क आकारणार आहे. बचत खात्यात आता महीन्यातुन फक्त ३ वेळाच पेैसे टाकता येणार आहे. चौथ्यांदा रक्कम जमा केल्यास ४० रू शुल्क लागणार…