अंमळनेर येथील पोलिस वसाहत उद्घाटना प्रसंगी व एरंडोल पोलिस स्टेशनच्या इमारतीचे ऑनलाईन उद्घाटनावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हे शेतकऱ्यांविषयी बोलले.
“तामिळनाडूमध्ये ज्याप्रकारे महिला सुरक्षेसाठी दिशा कायदा आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी कायदा आपण विधानसभेत संमत करू” असं त्यांनी सांगितलं. यासाठी मागणी करणाऱ्या प्रतापराव दिघावकर यांचं अनिल देशमुख यांनी अभिनंदन केलं.
यावेळी दिघावकर बोलताना म्हणाले की, “नाशिकची व्यवस्था पाहत असताना शेतकऱ्यांची अडकलेली ५ कोटी रक्कम मिळवून दिली, त्याचबरोबर १६६ व्यापाऱ्यांकडून दिवाळीपूर्वी रक्कम देण्याचं लिहून घेतलं आहे. जोपर्यंत स्त्रियांना पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर माहेरी आल्यासारखं वाटतं नाही आणि शेतकऱ्यांना समोर बसायला खुर्ची भेटत नाही तोपर्यंत पोलिस स्टेशन हे लोकाभिमुख होणार नाही.”
महत्वाच्या बातम्या –
“सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत याद राखा”- संजय राऊत
राज्यात १० वर्षाखालील केवळ ३.६१ टक्के मुलानांच कोरोनाची लागण!
पंतप्रधान किसान योजनेत लाखो बोगस नोंदी! खरे शेतकरी योजनेपासून वंचित…