चीनच्या वुहान शहरामध्ये हाहाकार माजवलेला एक व्हायरस आपल्या पर्यंत येऊन पोहचेल असं काही सुरुवातीला वाटलं नव्हतं. चीन खूप प्रगत राष्ट्र आहे म्हणून ते यावर कडक उपायोजना करतील आणि चीनचं हे संकट टळेल असं वाटलं होतं पण बघता बघता हा व्हायरस युरोपमध्ये देखील प्रचंड प्रमाणावर त्रासदायक ठरला आणि भारतात पहिला रुग्ण आढल्यावर मग हळूहळू भीतीच वातावरण तयार होतं गेलं. सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं मग वाटलं थोड्या दिवसात आपण यावर मात करू पण लॉकडाउन वाढत राहील, पण कोरोना रुग्णांची संख्या काही कमी झालं नाही, दरम्यानच्या काळात स्वतःला सकारात्मक ठेवण जास्त गरजेचं होतं. एकंदरीत वातावरण बघता सतत सकारात्मक राहन शक्य नव्हतं, कारण सुरुवातीला व्हायरस बद्दल जास्त काही माहिती नसल्यामुळे भीतीच जास्त होती, तेव्हा अश्यावेळी मनाला वाचनात गुंतवून ठेवणं मला जास्त योग्य वाटलं.
मला लॉकडाऊन मध्ये सगळ्यात जास्त सकारात्मक ऊर्जा प्रधान करणार पुस्तक ठरलं ते महात्रयारा लिखित “न पाठवलेलं पत्र” हे पुस्तक, सगळ्यांनी वाचलंच पाहिजे एवढं जबरदस्त हे पुस्तकं आहे. या पुस्तकातून मला शिकायला भेटलं की आपलं आयुष्य मृत्यू लांबणीवर टाकू शकणार नाही. त्यामुळे आयुष्य लांबणीवर नको टाकायला. म्हणून ठरवलं की आता कसलीच भीती मनात न बाळगता आपण बिनधास्त जगुयात, सरकारच्या गाईडलाईन्स फॉलो करत, खूप साऱ्या सुंदर पुस्तकांच्या सहवासात मनातील अनेक बोथट विचार नव्याने नव्या स्वप्नांच्या दिशेने धावू लागले आणि अनेक गोष्टींना अनेक पैलू असतात हेही कळत गेलं. चे ग्वेरा, लेनिन, मार्क्स, फिडेल कॅस्ट्रो वाचल्यावर भांडवलशाही राष्ट्रांचा समाजवादी अमेरिकेसोबतचा संघर्ष कळायला मदत झाली आणि त्यातून समाजवाद की साम्यवाद योग्य या दोन पैलूंचा उलगडा झाला. गिरीष कुबेर यांचं टाटायन आणि तेल नावाचा इतिहास वाचल्यावर तेलावर उभं राहिलेल्या अरब राष्ट्रांचा आर्थिक विकास कळायला मदत झाली.
अनेक पाकिस्थानी कवी, कवियत्री वाचल्यावर कळलं की तिथली सामान्य माणसं ही देखील शांततेच्या भावनेने जगाकडे बघतात आणि धर्म हा राष्ट्राच्या प्रगतीत बाधा आहे, अशी तिथल्या अनेक विचारवंतांची मतं आहेत हेही कळून आलं. अमृता प्रितमच्या रिकामा कॅन्व्हास मधल्या स्त्रियांचं दर्शन झालं आणि त्याकाळच्या स्त्रीच्या संघर्षमयी जीवनाच दर्शन झालं, जे आजच्याही स्त्रीच्या आयुष्याचं चित्रण काही अंशानं तसंच आहे हे कळून येईल. देवाचं अस्तीत्व नाकारणारं, सतत पत्नीच्या धार्मिक भावना दुखावनारा आणि त्या मुद्द्यावरून पत्नीशी घटस्फोट घेतलेला स्टीफन हॉकिंग पुढे ब्लॅक हॉल थेरी मांडल्या नंतर देव आहे की नाही? या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही देतो तेव्हा हे जरा आश्चर्यच वाटतं, अश्या काहीश्या विज्ञान आणि क्वांटम फिजिक्स न गोंधळायला भाग पाडलेल्या हॉकिंगची ओळख लॉकडाउन मध्ये नव्याने झाली.
युट्यूब वरती अनेक विचारवंतांना एकूण जगातील आश्चर्यकारक गोष्टींचा उलगडा झाला. मित्रांसोबत पहाडात जाऊन tracking केली आणि निसर्गाशी स्वतःला जोडून घेतल्यावर एक नव्या सकारात्मक ऊर्जेचा आभास झाला. लॉकडाउन मध्ये मी उर्दू शिकायला पण सुरुवात केली होती आणि उर्दू शिकलो सुद्धा, आपल्या जेव्हा कुठलीही भाषा शिकतो तेव्हा आपल्याला नव्या संस्कृतीच्या पाऊलखुणा सापडतात ज्या आपल्या पाउलखुणांशी साम्य साधतात म्हणून आपल्या विचारांची दिशा अजून विस्तारत जाते आणि भाषा ही एक वर्ग समुदायाची नसून ती सगळ्यांची असते हे कळत जात. लॉकडाउनमध्ये मी बासरी शिकायला पण सुरुवात केली आहे आणि बासरीच बेसिक्स आता कळायला लागलं, संगीत, वाद्य आपल मनोरंजन करत नसून मनोसर्जन सुद्धा करत म्हणून माणसानं आयुष्यात माणसानं एखादी कला आत्मसात करायला हवी कला आपल्याला आयुष्याकडे नव्याने बघायला भाग पाडत असते.
माणसानं आयुष्याच्या बाबतीत प्लॅनर असलंच पाहिजे पण चिंतीत असू नये, कारण आयुष्य हे खूप साऱ्या सरप्राईझेसनी भरलेलं असत म्हणून आपण प्रकाशाच्या वेगाने जाऊन सगळं काही स्थिर नाही करू शकत. आपल्याला घटनेचा स्वीकार वर्तमानात करण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो म्हणून माणसानं आयुष्याचा आनंद घेत राहावं, पहाडात जावं, पुस्तक वाचावीत, चित्रपट पहावीत आणि कठीण आयुष्याला अश्या प्रकारे सोपं करावं. कोरोनामुळे एक गोष्ट छान घडली ली आयुष्यात येणाऱ्या पुढील संकटासाठी मन तयार राहील ते ही न घाबरता, कोरोनाची भीती घेऊन आला होता आणि भीतीशी लढणं शिकवतोय म्हणून प्रत्येक फेज येते आणि जाते आपण न घाबरतात मैदानावर उभं राहणं आवश्यक आहे.
नक्की वाचा – स्वशोध लावणारा माझा लॉकडाऊन! – निशिगंधा अभंग