नागपुर | राज्यभरात कोरोनाच्या ३१ ऑक्टोबपर्यंत एकूण १६ लाख ७५ हजार ३३७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १० वर्षाच्या आतील केवळ ३.६१ % मुलांचाच समावेश आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.
काय आहे अहवाल ?
या अहवालानुसार राज्यात ३१ ऑक्टोबर पर्यंत एकूण १६ लाख ७५ हजार ३३७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
यामध्ये एकूण कोरोना बाधितात केवळ ६० हजार ५५५ (३.६१ टक्के) दहा वर्षांखालील मुलांचा समावेश आहे.
यात ११ ते २० वयोगटातील १ लाख १३ हजार ९३२ (६.८० टक्के) मुलांना करोनाचे संक्रमण झाले.
२१ ते ३० वयोगटात २ लाख ८१ हजार ८७५ (१६.८२ टक्के),
३१ ते ४० वयोगटात ३ लाख ५५ हजार ५९० (२१.२२ टक्के),
४१ ते ५० वयोगटात २ लाख ९९ हजार ६२४ (१७.८८ टक्के),
५१ ते ६० वयोगटात २ लाख ६८ हजार ३१३ (१६.०२ टक्के),
६१ ते ७० वयोगटात १ लाख ८१ हजार ५७० (१०.८४ टक्के),
७१ ते ८० वयोगटात ८६ हजार ३९६ (५.१६ टक्के),
८१ ते ९० वर्षे वयोगटात २४ हजार ३५७ (१.४५ टक्के),
९१ ते १०० वयोगटात ३ हजार ११५ (०.१९ टक्के),
१०१ ते ११० वर्षे वयोगटात १० रुग्णांनाच करोनाची बाधा झाली.
यामध्ये आतपर्यंन कोरोना बाधीत रुग्णांतील १५ लाख १० हजार ३५३ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण ९०.१५ टक्के इतके आहे. तर सध्या राज्यात १ लाख २३ हजार ५८५ अॅक्टिव रुग्ण आहेत. दरम्यान राज्यात आजपर्यंत कोरोनाने ४३ हजार ९११ मृत्यू झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
पंतप्रधान किसान योजनेत लाखो बोगस नोंदी! खरे शेतकरी योजनेपासून वंचित…
गजनी फेम असिनने आपल्या मुलीचे नाव “असे” का ठेवले ?
चार महिन्यात पतंजलीने केली २४१ कोटींची कमाई; कोरोनिलची ८५ लाखांहून अधिक विक्री