एकीकडे चंद्रपुरात वाघांच्या हल्ल्याची मालिका सुरू असताना मेळघाटातील वाघ मात्र बिनधास्त फिरताना दिसत आहेत. इथे वाघांना सुरक्षित वाटते म्हणूनच आज मेळघाटातील वाघांची संख्या ७० वर जाऊन पोहचली आहे. महाराष्ट्रातील जैवविविधतेचं भांडार आणि राज्यातील एकमेव व्याघ्र प्रकल्प, अशी ओळख असलेल्या मेळघाटात मानव आणि वाघांमध्ये संघर्ष न होता मैत्री झालेली दिसून येत आहे. जवळच असलेल्या चंद्रपूरच्या तुलनेत मात्र मेळघाटात वाघ आणि मानव यांच्यातला संघर्ष कमी आहे.
मेळघाटात मेळघाट व्याघ्र प्रकल्प, 4 वन्यजीव अभयारण्य आणि एक प्रादेशिक विभाग मिळून इथं तब्बल 291 खेडेगावं आहेत. आणि याचाच परिणाम म्हणून इथे मानव आणि वाघ यांच्यात संघर्ष कमी आहे. 1998 पासून आतापर्यंत इथल्या १९ गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज मेळघाटातील वाघांची संख्या 70 वर जाऊन पोहोचली आहे.
मेळघाटातील कोरकु समाजात वाघांना श्रद्धेचे स्थान दिले जाते, त्यामुळे आदिवासी समाजाकडून वाघांची शिकार केली जात नाही. तसेच मेळघाटात मेळघाटात तापी, सिपना, खंडू, डोलार आणि गाडगा या नद्यांमध्ये पाणी उपलब्ध असल्यानं वाघांचा मनुष्यवस्तीकडील संचार कमी आहे. त्याचबरोबर १९९८ पासून येथील गावांचं योग्य पुनर्वसन, वन्यजीव व्यवस्थापन, आणि मेळघाटातील भौगोलिक संरचनेचा फायदा मानव आणि वाघांमधील संघर्ष रोखण्यासाठी होत आहे. त्याच बरोबर येथील स्थानी वाघांना “कुला मामा” मानतात त्यामुळे येथील वाघांची संख्या अबाधित आहे.
येथील गावांमध्ये विस्तीर्ण प्रदेश, मोकळा अधिवास, खाद्य आणि पाण्याची मुबलक सोय असल्यानं इथले वाघ मनुष्यवस्तीकडे फिरकत नाहीत. वाघांसाठी पाणवठे निर्माण करणे, पाणवठ्यात वीष प्रयोग होऊ नये याची काळजी घेणे, जागोजागी कॅमेरे लावणे, अशी खबरदारीही घेण्यात येते. सोबतच मेळघाटातील वाघांची शिकार रोखण्यासाठी शिकार प्रतिबंधक दलाची कामगिरीही महत्वपूर्ण मानली जाते. वाघांना मुक्त संचार करता यावा म्हणून प्रशासनाकडून नजिकच्या गावांचं अशा प्रकारे पुनर्वसन करण्यात आलं.
मेळघाटात लक्ष्मी पूजनापासून सुरू होणारी दिवाळी पुढील १० दिवस चालते, त्यामुळेच येथील दिवाळी राज्यभर प्रसिद्ध आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर त्यांची यथासांग पूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते.
महत्वाच्या बातम्या –
तामिळनाडूतील दिशा कायद्यासारखा कायदा महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी आणणार – गृहमंत्री अनिल देशमुख
“सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत याद राखा”- संजय राऊत
राज्यात १० वर्षाखालील केवळ ३.६१ टक्के मुलानांच कोरोनाची लागण!
पंतप्रधान किसान योजनेत लाखो बोगस नोंदी! खरे शेतकरी योजनेपासून वंचित…