जगातला स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने कोरोनावर मात केली आहे. रोनाल्डोचा कोरोना अहवाल ३१ ऑक्टोबरला निगेटिव्ह आला आहे. अशी माहिती युव्हेंट्स संघाने दिली आहे. नेशन्स लीगमध्ये फ्रान्सविरुद्धचा सामना झाल्यानंतर रोनाल्डोची कोरोना चाचणी केली होती. यानंतर रोनाल्डोचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते.
कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे रोनाल्डोला पोर्तुगालकडून १ आणि युव्हेंट्सकडून ४ सामने खेळता आले नव्हते. जुवेंट्स क्लबने ही माहिती देत असे सांगितले की, “ख्रिस्तियानो रोनाल्डोची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. रोनाल्डो जवळपास १९ दिवसांनंतर कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आला आहे. आता त्याला आयसोलेशनमध्ये राहण्याची आवश्यकता नाही.” ही माहिती त्यांनी ट्विट करून दिली.
. @Cristiano recovers from Covid-19https://t.co/4etecyAw0O pic.twitter.com/YPZSm0My8A
— JuventusFC (@juventusfcen) October 30, 2020
दरम्यान, कोरोनातून बरा झाल्यानंतर रोनाल्डोने स्पेझिया संघासोबत एक सामना खेळला. ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपला नेहमीचा खेळ दाखवत रविवारी जुवेंट्स संघाला ४-१च्या गुणाने विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या –
मराठमोळ्या ऋतुराजची दमदार खेळी!