राजकीय प्रचार करण्यात नेहमीच अग्रस्थानी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या मागील वर्षांत, रोजच्या जाहिरातींवर दोन कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते जतिन देसाई यांनी आरटीआय अंतर्गत ही माहिती मागवली होती. याच अर्जाला उत्तर देत केंद्र सरकारकडून प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, आणि आऊटडोअर प्रचारासाठी एकूण तीन हजार ७६७ कोटी २६ लाख ५१ हजार रुपये खर्च केल्याची माहिती उघड झाली आहे.
माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारने स्वत:च्या प्रचारासाठी मागील आर्थिक वर्षामध्ये वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि होर्डींग्सच्या माध्यमातून जाहिरातींवर करदात्यांचे ७१३ कोटी २० लाख रुपये खर्च केले आहेत. तसेच केंद्राने २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये जाहिरातींवर दिवसाला सरासरी एक कोटी ९५ लाख रुपये खर्च केल्याचे ब्यूरो ऑफ अकाटरिच अॅण्ड कम्युनिकेशनने सांगितले आहे.
मागील वर्षीच्या निवडणुकांना सरकारने ७१३ कोटींपैकी इलेक्ट्रॉनिक मीडियावर ३१७ कोटी ५ लाख, प्रिंट मीडियावर २९५ कोटी ५ लाख आणि आऊटडोअर म्हणजेच होर्डींग आणि जाहिरातींवर १०१ कोटी १० लाख रुपये खर्च केला होता.
महत्वाच्या बातम्या –
मोदींची नाही, तर त्यांच्या वडीलांची सुद्धा नव्हती चहाची टपरी ! रेल्वेचा मोठा खुलासा
गुजरात मधील योजनांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण…