सध्या अमेरिकेत निवडणुकीचं वारं वाहत आहे. सगळीकडे बाईडन विरूध्द ट्रम्प हे वातावरण तयार झालं आहे. मागच्या काही दिवसांत एक्झिट पोल वरून बाईडन पुढे आहेत, अशी चर्चा सुरू होती त्याचबरोबर ७ स्विंग स्टेट अशी देखील चर्चा पाहायला मिळत आहे, परंतु ही सात राज्य कोणती? आणि स्विंग स्टेट म्हणजे नक्की काय? हे आपण जाणून घेऊ.
स्विंग स्टेट्स म्हणजे काय?
आपल्याला साधारणपणे असं वाटतं असेल की, अमेरिकेतील सगळी राज्य किंवा जनता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण? हे ठरवत असतील, परंतु असं नाही तर अमेरिकेतील केवळ सात राज्य ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडीसाठी निर्णायक ठरतात आणि याच राज्यांना ‘स्विंग स्टेट’ असं म्हटलं जातं. पण असं का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आपण याविषयी जाणून घेऊ.
कशी होते निवडणूक?
अमेरिकेत लोक प्रत्यक्षपणे राष्ट्राध्यक्ष निवडून देत नाहीत तर प्रत्येक राज्यात प्रतिनिधी म्हणजेच एलेक्टोरल असतात. त्यांना लोक मतदान करतात आणि पुढे जाऊन हे एलेक्टोरल राष्ट्राध्यक्ष निवडतात. त्यामुळे अमेरिकेत सर्वाधिक लोकांची मतं असलेला उमेदवार नाही तर सर्वाधिक एलेक्टोरल मतं मिळालेला उमेदवार जिंकतो. अमेरिकेतील प्रत्येक राज्याचा यासाठीचा आकडा फिक्स आहे.
अमेरिकेत ५० राज्यात मिळून ५३८ एवढे एलेक्टोरल्स आहेत आणि कॅलिफोर्निया या राज्यात सगळ्यात जास्त म्हणजे ५५ एवढे व्होटस् आहेत. परंतु अशी मोठी राज्य ज्यामध्ये जास्त एलेक्टोरल्स व्होटस् असून देखील राष्ट्राध्यक्ष निवडीत ही राज्य निर्णायक ठरत नाहीत, कारण मागच्या २० वर्षांपासून ही सगळी राज्य दोन पक्षांमधील एकाच पक्षाला परंपरागत मतं देत आली आहेत. अशी अमेरिकेतील परंपरागत अशी ५० पैकी जवळपास ३८ राज्य आहेत. मात्र बाकीची राज्य प्रत्येक निवडणुकीत पक्षसापेक्ष वेगळी मतं देत असतात, त्यामुळे या राज्यांना स्विंग स्टेट्स असं देखील म्हणलं जातं.
यामध्ये १२ राज्य होती, मात्र सध्या त्यातील ७ राज्य ही स्थिरावत असून बाकी ७ राज्यांमध्ये आपण अंदाज लावू शकत नाही.
कोणती आहेत ही सात राज्य?
१. अरिझोना
२. बिस्कोंसिन
३. फ्लोरिडा
४. पेन्सिल्वेनिया
५. नॉर्थ कॅरोलिना
६. जॉर्जिया
७. मिशिगन
तर या कारणांमुळे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी ही सात राज्य अतिशय महत्वपूर्ण ठरतात.
महत्वाच्या बातम्या –
वंदे मातरम गाणं म्हणणाऱ्या “ह्या” चिमुकलीचा व्हिडीओ पंतप्रधान आणि संगीतकार रेहमानने देखील केला शेअर!
अभिमानास्पद : १३६० एकरात जंगल तयार करणाऱ्या “या” भारतीय फॉरेस्ट मॅनची कथा आता अमेरिकन पाठ्यपुस्तकात
मतदानासाठी आईला हातात उचलुन आणलं, तर एकाने वडीलांना पाठीवर आणलं! व्हिडीओ व्हायरल