कोरोना विषाणूने जगभर आणि देशभर घातलेल्या थैमानामुळे पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था बिकट झाली असुन लोकांचे जॉब गेले. अनेकांना नोकरीवरून काढून टाकलं, नोकरकपात, पगारकपात करण्यात आली. त्यामुळे अनेक लोकांना घरात बसावं लागलं आणि जिवंत राहण्याचा प्रश्न समोर पडला. यातून समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या रिपोर्टमध्ये असं म्हणण्यात आलं आहे की, लॉकडाऊनमध्ये जवळपास ४६% लोकांना जगण्यासाठी पैसे उधार घ्यावे लागले आहेत.
हा रिपोर्ट होम क्रेडिट इंडियाकडून तयार करण्यात आला आहे. लोकांना आपलं घर चालवण्यासाठी उधार पैसे आपल्या मित्र, नातेवाईकांकडून घ्यावे लागले असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. यासाठी ७ शहरांमधून जवळपास १००० लोकांकडून मतं नोंदवून घेण्यात आली होती.
काय म्हणण्यात आलं आहे सर्वेमध्ये?
१. बहुतेक लोकांना पगारकपातीमुळे पैसे घ्यावे लागले असल्याचं लोकांनी सांगितलं होतं, त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आधी असलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी पैसे घ्यावे लागले असं २७% लोकांनी सांगितलं.
२. जवळपास १४% लोकांनी आपली नोकरी गेल्यामुळे पैसे घेतले असल्याचं म्हटलं आहे.
३. यामधील बहुतेक लोकांनी, ही सगळी कोरोनाची परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर नोकरी लागल्यावर पैसे परत करणार असल्याचं सांगितलं आहे
४. याबाबत प्रामुख्याने हे देखील दिसून आलं आहे की, घरातील २३% पुरुष पैसे उधार घेण्यासाठी पुढाकार घेतला होता.
५. त्याचबरोबर मुंबई आणि भोपाळ इथं सर्वाधिक म्हणजे २७% लोकांनी आपल्या मित्र आणि नातेवाईकांकडून उधार पैसे घेतले असल्याचं दिसून आलं आहे.
या रिपोर्टमध्ये समाजातील भीषण वास्तव समोर आलं आहे. खरंतर हा रिपोर्ट मर्यादित स्वरूपाचा असल्यामुळे याहीपालिकडे परिस्थिती किती गंभीर असू शकते? याचा अंदाज आपण लावू शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारने यावर पावलं उचलणं गरजेचं असल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या –
पुछता है मुंबई पोलीस! अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णबला अटक
ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्या प्रकरणी विराट आणि सौरव गांगुलीला कोर्टाची नोटीस!