चेन्नई | बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हे एका नव्या वादात सापडले आहेत. ऑनलाईन सट्टेबाजीचा प्रचार केल्यामुळे या दोघांनाही मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने २ नोव्हेंबरला नोटीस पाठवली आहे. याचबरोबर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या अन्य ऍप्सलाही नोटीस बजावण्यात आली आहे.
ऑनलाईन सट्टेबाजीच्या ऍप्सवर सामने खेळून पैसे गमावल्यानंतर काही तरुणांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे वकील मोहम्मद रिझवी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. काही आयपीएल संघांच्या नावावर ऍप्स आहेत. चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स हे ते संघ आहेत.
खंडपीठाने पुढे या ऍप्सच्या मालकांवर आरोप केला आहे. कोट्यवधी रुपयांची कमाई करण्यासाठी काही सेलिब्रिटींचा वापर केल्याचा आरोप या ऍप्सच्या मालकांवर केला आहे. या पाठवलेल्या नोटीस मध्ये काही सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. या सर्व सेलिब्रिटींना १९ नोव्हेंबरपर्यंत खंडपीठाने पाठवलेल्या नोटीसच उत्तर द्यावे लागणार आहे.
हे आहेत ते सेलिब्रिटी:
अभिनेते प्रकाश राज, अभिनेत्री तमन्ना भाटिया, राणा आणि सुदीप खान यांचा यात समावेश आहे. याचिका दाखल करणाऱ्या वकीलांच म्हणणं आहे की “ऑनलाईन सट्टेबाजीच्या ऍप्सवर बंदी घालण्याच्या सूचना जारी कराव्यात कारण त्याचा युवा पिढीवर वाईट परिणाम होत आहे”
विराट कोहली आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया हे दोघेही एका ऍप्सचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. हे दोघेही मोबाइल प्रिमियर लीगची जाहिरात करतात.