३ नोव्हेंबरला झालेल्या सामन्यात एक धक्कादायक प्रसंग पाहायला मिळाला. हा प्रसंग पाहून थोड्या वेळासाठी चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला होता. फलंदाजी करत असलेल्या धवल कुलकर्णी धाव घेत असताना क्षेत्ररक्षकाने विकेटकीपर कडे जोरात फेकलेला चेंडू थेट धवल कुलकर्णीच्या हेल्मेटवर येऊन आदळला. हा प्रकार धवल कुलकर्णी दुसरी धाव पळत असताना घडला. धवल कुलकर्णीचा या आयपीएल मधील हा पहिलाच सामना होता. सुदैवानं त्याला काही झालं नाही.
या घटने अगोदरच सचिन तेंडुलकरने एक ट्विट केलं होत. या अगोदरच्या सामन्यात असाच प्रकार घडला होता. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या सामन्यात निकोलस पूरनने फेकलेला चेंडू थेट विजय शंकरच्या डोक्याला जाऊन लागला.सामना काही वेळासाठी थांबवण्यात आला होता. सुदैवाने विजय शंकरला काही झाले नाही आणि त्याने पुन्हा खेळण्यास सुरू केली होत.
“क्रिकेट हा फार वेगवान खेळ नक्कीच झाला आहे. परंतु खेळाडूंच्या सुरक्षेबाबत काय? “आयपीएल मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात एक मोठी हानी टळली. त्यामुळे आयसीसीने किमान व्यावसायिक पातळीवरील सर्व प्रकारच्या क्रिकेटपटूंना हेल्मेट घालणे बंधनकारक करावे” अशी सचिन तेंडुलकरने आयसीसीला कळकळीची विनंती केली आहे.
The game has become faster but is it getting safer?
Recently we witnessed an incident which could’ve been nasty.
Be it a spinner or pacer, wearing a HELMET should be MANDATORY for batsmen at professional levels.
Request @icc to take this up on priority.https://t.co/7jErL3af0m
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 3, 2020
धवल कुलकर्णी सोबतचा हा प्रकार पाहून सचिनने ट्वीट केले की “हेल्मेट का अनिवार्य केले पाहिजे, याचे आणखी एक उदाहरण, बरं झालं माझा मित्र धवल कुलकर्णीने हेल्मेट घातले होते” आयसीसी, बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड अशा सर्व मोठ्या क्रिकेट बोर्डांना टॅग करत सचिन तेंडुलकर म्हणाले की या गोष्टी ला गांभीर्यानं घेतलं पाहिजे. आणि हेल्मेट सक्तीची विनंती त्यानं केली.
Another example of why helmets need to be made mandatory.
Thank God my friend @dhawal_kulkarni was wearing one.@BoriaMajumdar https://t.co/3ZRv8fGLKe— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 3, 2020