एस. टी. कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे, तसेच ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे, त्यासोबतच महागाई भत्ता आणि दिवाळी अग्रिमची कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे. कोरोनाच्या संकटातही एसटीच्या विविध विभागातून बेस्टच्या सेवेसाठी मुंबईत आलेल्या एसटीच्या चालक, वाहक, तसेच इतर कर्मचारी, अधिकारी यांना किती “बेस्ट “सर्व्हिस मिळतेय या बाबत वेळोवेळी प्रकार उघडकीस आले आहेतच.
आधीच तीन महिन्यापासून वेळेवर वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे, त्यामुळे घर खर्च ही चालवणे अवघड झाले आहे, त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुंबईत ‘बेस्ट’ च्या सेवेसाठी आलेल्या एसटीच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना केवळ प्रति व्यक्ती दोनशे रुपये भोजन भत्ता अग्रीम म्हणून ४ नोव्हेंबर पासून देण्याचं परिपत्रक जारी करण्यात आलंय.
अग्रिम म्हणजे उचल २०० रुपये करण्यात आली आली जी आधी ५०० रुपये होती, त्यामुळे उरलेले ३०० रुपये कोणाच्या खिशात जाणार , तसेच केवळ २०० रुपयात नाश्ता, भोजन कसे उपलब्ध होईल असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. मूळ परिपत्रकात या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या नाश्ता आणि भोजनासाठीचे अग्रीम हे 500 रुपये लिहले असताना ते खोडून केवळ 200 रुपये करणारे ‘झारीतील शुक्राचार्य कोण’ असा सवाल या कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे.
जेवणात आळ्या सापडल्या म्हणून त्याबदल्यात कर्मचाऱ्यांना केवळ 200 रुपयाचा अग्रिम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना वेळेत आणि पुरेसे जेवण पुरवण्यात येत नव्हते, त्यातच जेवणात आळ्या सापडल्याने गोंधळ निर्माण झाला होता. या परिस्थितीची इंटक या संस्थेने दखल घेत, जेवण पुरवठा करणाऱ्या खासगी संस्थेचे कंत्राट रद्द करुन कर्मचाऱ्यांना 300 रुपये देण्यात यावे अशी मागणी केली होती.
हे 200 रुपयाचे अग्रिमही भविष्यात कर्मचाऱ्यांच्या पगारातून वजा करणार आहे. एकतर तीन महिने पगार नाही, त्यात मुंबईला सेवा बजावायला यायचे आणि नाश्ता व जेवनाला मिळणारे पैसेही भविष्यात पगारातून वजा होणार अशा संकटात जगायचे कसे असा प्रश्न कर्मचाऱ्यां पुढे आहे. त्यामुळे आपलं गांव, जिल्हा, विभाग सोडून मुंबईत आलेल्या या कर्मचाऱ्यांना मनस्तापच अधिक सहन करावा लागतोय.
महत्वाच्या बातम्या –
एसटी महामंडळ बसस्थानके गहाण ठेवण्याच्या विचारात…
पुछता है मुंबई पोलीस! अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णबला अटक
पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो, पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना? कंगनाने दिली प्रतिक्रिया
ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्या प्रकरणी विराट आणि सौरव गांगुलीला कोर्टाची नोटीस!