‘आई माझी काळूबाई’ या मालिकेला अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने रामराम केल्यानंतर ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या प्राजक्ताची भूमिका वीणा जगताप करत आहे.
आपल्या सहकलाकाराच्या वागणुकीमुळे ही मालिका सोडत असल्याचे प्राजक्ता गायकवाड म्हणाली आहे. परंतु याला प्रतिउत्तर देत मालिकेच्या निर्मात्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी “प्राजक्ताला मालिकेतून काढून टाकण्यात आले असल्याचे” म्हणले आहे. मात्र यावर बीबीसीशी बोलताना प्राजक्ताने “मला सीरिअलमधून काढण्यात आलं नाहीये, मी स्वतःहून ही मालिका सोडली आहे. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचे प्राजक्ताचे म्हणणे आहे.
तसेच तिने स्वतःसोबत घडलेल्या घटनेचा देखील खुलासा बीबीसीशी बोलताना केला. “सगळेजण कोरोना आल्यानंतर आम्ही मुंबईला जायला निघालो. माझ्यासोबत विवेक सांगळे येणार होते. ते दोन तास उशीरा आले. मी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, जे कोव्हिड पॉझिटिव्ह लोक होते, त्यांना मी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून येत आहे.”
“हे ऐकल्यावर मनात शंका आली की, ही व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आली होती. त्यांच्यासोबत सातारा ते मुंबई प्रवास कसा करायचा? सगळं जग काळजी घेत असताना हा विचार करणं स्वाभाविक होतं. मी हे बोलून दाखवल्यावर त्यांनी मला शिवीगाळ करायला सुरूवात केली. हे सगळे मी अलका कुबल यांना सांगितले. दोन-तीन वेळा याबद्दल बोलूनही त्यांनी याची दखल घेतली नाही. या कारणावरून प्राजक्ताने मालिका सोडल्याचे सांगितले.
परंतु या घटनेवर बोलताना “त्या मुलाने त्यांना शिव्या दिल्या नाहीत. प्राजक्ताने त्याला गाडीतून उतरायला सांगितल्यामुळे त्याला राग आला. तो गाडीबाहेर उतरून फोनवर कोणाशी तरी बोलायला लागला असल्याचे अलका कुबल यांनी म्हणले.
नक्की वाचा-
“हलाल”- सामाजिक संदेश देणारा सिनेमा!