आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात सामना रंगणार आहे. आयपीएलमधील हा पहिला प्लेऑफ सामना आहे. दोन्ही संघाची कामगिरी यंदाच्या हंगामात उत्कृष्ट आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत जाणार आहे, आणि पराभूत होणाऱ्या संघाला दुसरी संधी मिळेल. या सामन्यात पराभव होणारा संघ एलिमिनेटर सामन्यातील जो विजयी संघ आहे त्या संघासोबत दुसरा क्वॉलिफायर सामना खेळेल.
मुंबई इंडियन्स आता पहिल्या मेन टीम सोबत मैदानावर उतरेल. मागील सामन्यात मुंबईने हार्दिक पांड्या, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह या तिन्ही खेळाडूंना रेस्ट दिली होती. मात्र आता मुंबई संघात सर्व अॅक्शनमध्ये असणाऱ्या खेळाडूंना घेऊन मैदानावर उतरेल. तसेच आजच्या दिल्ली कॅपिटल कडून अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला संधी मिळू शकते. अजिंक्य रहाणेचा अनुभव आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल साठी फायदेशीर ठरू शकतो.
मुंबईने आतापर्यंत १४ पैकी ९ सामने जिंकले आहेत आणि ५ सामने गमावले आहेत. उत्कृष्ट कामगिरी करत पॉईंट टेबल मध्ये मुंबई इंडियन्स पहिल्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल ने १४ पैकी ८ सामने जिंकले आहेत आणि ६ गमावले आहेत. पॉइंट टेबल मध्ये ही टीम दुसऱ्या स्थानावर आहे. या हंगामात मुंबईने दिल्लीचा दोनवेळा पराभव केला आहे. या मानाने मुंबई इंडियन्स संघ आयपीएल मध्ये बलाढ्य संघ ठरतोय.
सूर्यकुमार यादव, एशान किशन, डिकॉक, कायरान पोलार्ड, हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूंनी संघाला या स्थानावर पोहचवलं आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हे सामना जिंकवून देणारे गोलंदाज आहेत. दिल्ली संघाकडून शिखर धवनवर अधिक जबाबदारी असल्याचे दिसत आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतसारखे फलंदाज तेवढे फॉर्ममध्ये दिसत नाहीत. गोलंदाजीमध्ये कगिसो रबाडा ही उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे. रबाडाकडे पर्पल कॅप आहे तर या स्पर्धेत बुमराह दुसर्या स्थानावर आहे.आतापर्यंत रबाडाने २५ विकेट्स घेतल्या आहेत तर जसप्रीत बुमराहने २३ विकेट्स घेतले आहेत.
आजच्या सामन्यात दोन्ही संघ फायनलसाठी लढणार आहेत. कोणता संघ फायनल मध्ये जाणार हे पाहणं खूप रोमांचक ठरेल. हा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या- त्या दिवशी विराट वडीलांच्या अंत्यसंस्काराला गेला नाही, पण मैदानात उतरला आणि…
फलंदाजी करताना हेल्मेट घालणे बंधनकारक करावे -सचिन तेंडुलकर
ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्या प्रकरणी विराट आणि सौरव गांगुलीला कोर्टाची नोटीस!