रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी पनवेल पोलिसांनी अटक केली, ही अटक झाल्याचे समोर येताच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली आहे, त्यानंतर दुपारी अर्णब यांना आलीबागच्या कोर्टात हजर करण्यात आलं आहे, या बाबतीत भाजपने सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे, महाराष्ट्रात आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.
या बाबत आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली त्या ९ पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. पोलिसांबद्दल आदर आहेच, तरी पोलिसांनी मारहाण करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
लोकतंत्र के चौथे स्तंभ पत्रकारिता पर हमला, पत्रकारों की अभिव्यक्ति की आज़ादी पर हमला , #अर्नबगोस्वामी जी को तुरंत रिहा करने और बदले की भावना से उनपर तथा उनके परिवार पर लगाए गए आरोपों को खत्म करने, अर्नब के साथ बदसलूकी करने वाले 9 पुलिसकर्मियों को ससपेंड करने की मांग..
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 5, 2020
याच प्रकरणा दरम्यान आमदार राम कदम यांनी मुखयमंत्र्यांना एक पत्र लिहिले त्यात प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी वरळी येथील घरातून रायगड पोलिसांनी अटक केली, त्यावेळी नियमांचे उल्लंघन करून अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली, आम्ही पोलिसांच्या वर्दीचा आदर करतो परंतु पोलिसांनी ज्या प्रकारे अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली ते समाज सहन करणार नाही. त्या ९ पोलिसांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.
तसेच पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे पत्रकारितेवर हल्ला करणारे आणि देशाला आणीबाणीच्या दिशेने नेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह देशाची माफी मागितली पाहिजे, आणि अर्णब गोस्वामी यांची तत्काळ सुटका करायला हवी अशी मागणी केली आहे. अर्णब गोस्वामी यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली नाही तर आम्हाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जावे लागेल असे राम कदम यांनी सांगितले.
पत्रकार #अर्नबगोस्वामी को मारपीट करने वाले 9 पोलीस वालो को तुरंत सस्पेंड करके उसकी जाँच की जाये इस माँग के लिए आज सुबह महामहिम राज्यपाल से भेंट की .
पोलीस के प्रती भरती पुरा आदर-सन्मान लेकिन मारपीट मंज़ूर नहीं #ArnabWeAreWithYou #ArnabPrideOfIndia #EmergencyInMaharashtra pic.twitter.com/zjAXOeAsuR— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 5, 2020
अर्णब यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला असता अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा हात उचलला नाही असे स्पष्टीकरण दिले. त्यांनतर अर्णब न्यायलयात हातवारे करत, इशारे करत असल्याचे दिसताच न्यायधिश संतापले आणि त्यांनी तुम्ही आधी नीट उभे रहा असे खडसावले.
पोलिसांनी कोर्टाची परवानगी न मागता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू केली, तर अन्वय नाईक, आई कुमुद यांचा मृत्यू आणि आरोपींचा काय संबंध आहे हे रायगड पोलिस न्यायालयाला समजून सांगू लागले परंतु पुरावे देऊ शकले नाहीत त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या पोलिस कोठडीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
सुमारे ८ ते ९ तास या बाबत कोर्टात सुनावणी सुरू होती, न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना १८ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या –
अर्णब गोस्वामी हा व्हायरस आहे -अक्षता नाईक
पुछता है मुंबई पोलीस! अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णबला अटक