लॉकडाऊन संपून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. राज्यातील गेल्या सात महिन्यांहून अधिक काळासाठी बंद असलेल्या सिनेमागृहे खुले करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजपासून राज्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहं तसेच मल्टिप्लेक्सेस हे ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.
मात्र या ठिकाणी खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या इनडोअर गेम्स सह इनडोअर शूटिंग रेंज सुरू करण्यासाठी ही राज्य सरकारने परवानगी दिली आहे. खेळाडूंना काही नियम बंधनकारक आहेत. जसे की सोशल/फिजिकल डिस्टंसिंग चे पालन करणे आणि दर तासाला सॅनिटायझेशन करणे. हे नियम पाळून खेळाडूंना सराव करता येणार आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सरावासाठी जलतरण तलाव सुरू करण्यासही राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र कंटेन्मेंट झोनमधील जलतरण तलाव बंदच राहणार आहेत.
यासोबतच, योगा अभ्यास केंद्रं सुरू करण्याची परवानगी देखील दिली गेलीय. यासाठीची नियमावली सार्वजनिक आरोग्य विभाग जारी करेल. त्यासाठी हा विभाग केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या नियमावलीचा आधार घेईल, असं सरकारनं पत्रकात म्हटलं आहे.
गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य नियम पाळून चित्रपटगृहं, नाट्यगृहं, मल्टिप्लेक्सेस सुरू करण्याची मागणी काही दिवसांपासून सुरू होती. शेवटी राज्य सरकारनं मनोरंजन क्षेत्राला दिलासा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या –
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त…
सकाळ समूहाने केला न्यूजलॉन्ड्रीवर मानहानीचा गुन्हा दाखल; ६५ कोटी मानहानीची रक्कम!