अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बाईडन होणार की डोनाल्ड ट्रम्प होणार याकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार ज्यो बाईडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मागं टाकलं आहे. त्यामुळे ज्यो बाईडन हेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील असं चित्र दिसत आहे. पण जर ज्यो बाईडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तर भारताला याचा काय फायदा होईल हे महत्त्वाचं ठरणार आहे.
खरंतर ज्यो बाईडन यांची भारताविषयीची भूमिका पहिल्यापासूनच सकारात्मक दिसत आहे. ज्यावेळी भारतात 1998 मध्ये परमाणू चाचणी करण्यात आली होती, त्यावेळी ज्यो बाईडन यांनी भारताचं समर्थन केलं होतं. ‘भारत देश लीबिया किंवा नॉर्थ कोरिया सारखा देश नाही. भारताच्या परमाणू चाचणी करण्यावर जगाने चुकीचा अर्थ घेतल्याचे देखील ज्यो बाईडन यांनी म्हटलं होतं.
2008 मध्ये भारत आणि अमेरिकेत ऐतिहासिक परमाणू करार झाला होता, त्या कराराच्या समर्थनात ज्यो बाईडन यांनी मतदान केलं होतं. तेव्हा ते परकीय संबंध समितीचे प्रमुख होते. एवढंच नव्हे तर भारत आणि अमेरिकेची मैत्री असणं देशात जगाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे, असं देखील ते म्हणाले होते. त्यामुळे जर ज्यो बाईडन अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती झाले तर भारताचे अमेरिकेसोबत मैत्रीचे संबंध अजून घट्ट करण्यास मदत होईल.
महत्वाच्या बातम्या –
अमेरिका इलेक्शन: ज्यो बायडन यांनी मोडला बराक ओबामा यांचा “हा” विक्रम!
अमेरिका इलेक्शन : ट्रम्प यांनी का घेतली कोर्टात धाव?