मराठमोळे लेखक उद्योजक श्री ठाणेदार हे आता थेट अमेरिकेतील मिशिगन प्रांतात सिनेटर Senator म्हणजेच आमदार म्हणून निवडून आले आहेत. यातली विषेश बाब म्हणजेजे ते आजदेखील अस्सल मराठीत बोलतात. आपल्या विजयानंतर त्यांनी भारतीय माध्यमांना इंग्रजीसोबत मराठीतून देखील प्रतिक्रीया दिल्या.
वयाच्या 24 व्या वर्षी मी अमेरिकेत आलो. येथे छान व्यवसाय केला. त्यानंतर व्यवसायात चांगला जम बसला असताना मला इथल्या लोकांसाठी काही करावे असे वाटले. त्यामुळे मी माझा व्यवसाय विकून टाकला. त्यातून आलेले बरेचसे पैसे मी माझ्या कामगारांना बोनस म्हणून दिले. आता मी राजकारणात उतरलोआहे. महत्त्वाचे म्हणजे माझे राजकारण मी माझ्या पैशांवर करतो. त्यासाठी मी कोणाकडून निधी अथवा देणगी घेत नाही. आता मला येथील नागरिकांसाठी आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण अशा अनेक गोष्टींसाठी काम करायचे आहे. असं श्री ठाणेदार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना ते असं देखील म्हणाले की, मी अमेरिकेत असलो तरी आजही मला माझ्या महाराष्ट्राची, बेळगाव, कोल्हापूरची आठवण येते.बेळगावचा कुंदा मला फार आवडतो. अनेकदा मी पुस्तकांसाठी, माझ्या लिखानासाठी भारतात येत असतो. या आधी मी गव्हर्नर पदासाठी निवडणूक लढलो होतो. भारतात मुख्यमंत्री असतात इथे गव्हर्नर असतात. ही निवडणूक मी काही वर्षांपूर्वी लढलो. परंतू, मला त्यात यश मिळाले नाही. पण आता मी आमदार म्हणून निवडूण आलो. जे काम मी मुख्यमंत्री (गव्हर्नर) म्हणून काम करायचे ते मी आता मिशिनगमधील लोकांसाठी करेन, असेही श्री ठाणेदार यांनी या वेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या – USA ELECTION: जो बाईडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तर भारताला ‘हा’ फायदा होणार
अमेरिका इलेक्शन: ज्यो बायडन यांनी मोडला बराक ओबामा यांचा “हा” विक्रम!
अमेरिका इलेक्शन : ट्रम्प यांनी का घेतली कोर्टात धाव?