सध्या सर्वत्र अमेरिका निवडणुकीबाबत चर्चा सुरू आहे. यामध्ये सध्या बायडन यांनी आघाडी घेतली आहे त्याचबरोबर बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा सर्वाधिक मतं मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. आतापर्यंत बायडन यांनी ५०.४% एवढी मतं मिळवली आहेत तर ट्रम्प यांना ४८% एवढी मतं मिळाली आहेत. बायडन सध्या २६४ एवढी इलेक्टोरल व्होट्स मिळवून आघाडीवर आहेत, तर ट्रम्प यांना २१४ एवढी मतं आहेत.
ज्यो बायडन यांना आतापर्यंत ७ कोटी २० लाख ७१ हजार ४४४ एवढी मतं मिळाली आहेत तर ट्रम्प यांना ६ कोटी ८५ लाख ९८ हजार ९१७ एवढी मतं मिळाली आहेत. यापूर्वी बराक ओबामा यांनी २००८ मध्ये सर्वाधिक म्हणजे सहा कोटी ९४ लाख ९८ हजार ५१६ एवढी मतं मिळाली होती. कदाचित यावेळी ट्रम्प देखील ओबामा यांचा विक्रम मोडू शकतात, कारण अजून देखील मतमोजणी चालू असल्याचं दिसत आहे.
यावेळी खूपच चुरशीची लढत दिसत आहे आणि त्याचबरोबर यावेळी लोकांचं मत देण्याचं प्रमाण देखील वाढल्याचं दिसून आलं आहे. आणि आतापर्यंतच्या एकूणच निकालावरून अमेरिकेत सत्तांतर होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
अमेरिका इलेक्शन : ट्रम्प यांनी का घेतली कोर्टात धाव?
आजपासुन राज्यात सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू होणार!