परतीच्या पावसाने शतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले होते. कोरोनामुळे आधीच सगळं संकटात असणाऱ्या शेतकऱ्याची दिवाळी गोड करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. यामुळे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याची माहीती आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
यामुुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवार पासुन मदत जमा व्हायला सुरुवात होणार आहे. राज्यात विधान परिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहीता लागू होती. यामुळे शेतकऱ्यांना मदत पोहोचवायला विलंब झाला आहे. यासोबत मदत वाटपात कोणताच अडथळा येणार नाही असं देखील वडेट्टीवार म्हणाले
दरम्यान, दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासा देणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
दिवाळी; राज्यात देखील फटाके फोडण्यावर बंदी येणार?
“कोणीही बाहुबलीने रस्त्यावर येऊन आंदोलन करुन दाखवावं! राजू शेट्टींचा विरोधकांना इशारा
अर्णब प्रकरणावरून राजु शेट्टी भडकले! म्हणाले…