मध्यंतरी दक्षिण कोरियामध्ये एका आगळ्यावेगळ्या चळवळीने जन्म घेतला होता. ती चळवळ होती ब्रा चळवळ! अनेकांना या चळवळीचे नाव ऐकल्यावर हसायला आले असेल परंतु ही चळवळ देखील स्त्रियांच्या हक्काचा भाग म्हणूनच होती.
दक्षिण कोरियन अभिनेत्री आणि गायिका सल्ली हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पहिल्यांदा ब्रा न घातलेला फोटो टाकला. यानंतर अनेक स्त्रियांनी #NoBra या हॅशटॅगसह सोशल मीडियावर स्वतचे तसेच फोटो शेअर केले. हे फोटो वाऱ्यासारखे सगळीकडे पसरले. आणि ब्रा चळवळ सुरू झाली. ह्या चळवळीत जगभरातील महिला सहभागी होत होत्या.
From Old Hollywood stars to current models, these women caused a stir for their braless fashion moments #NOBRA #BRALESS #FREETHENIPPLE: https://t.co/PgAksb2dG3 pic.twitter.com/vODdtOjr3R
— L'OFFICIEL USA (@LOFFICIELUSA) November 3, 2020
ब्रा चा इतिहास
आज आपण याच चळवळीचा विषय ठरलेल्या ब्रा बदल बोलणार आहोत. सुरुवातीला ग्रीसच्या इतिहासात ब्रासारख्या दिसणाऱ्या कपड्यांचं चित्रण केलेले आढळून आले आहे. स्तन झाकण्यासाठी रोमन साम्राज्यातल्या देखील स्त्रिया छातीभोवती एक कपडा बांधायच्या.
खरे तर 1911मध्ये ब्रा या शब्दाला ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत स्थान मिळालं. ‘brassiere’ या फ्रेंच शब्दाचं ब्रा असे संक्षिप्त रूप आहे. ‘Brassiere’चा अर्थ म्हणजे शरीराच्या वरचा भाग असा होतो. फ्रान्सच्या हर्मिनी कॅडोल यांनी 1869मध्ये कॉर्सेटला दोन तुकट्यांत तोडून स्त्रियांचे अंतर्वस्त्र तयार केले. याच वस्त्राचा वरचा भाग नंतर ब्रा म्हणून घालण्यात येऊ लागला आणि नंतर तसा विकण्यातही आला. ही अंतर्वस्त्र विकण्यासाठी देखील फ्रान्समध्येच पाहिली मॉर्डन तयार करण्यात आली.
ब्रा आणि स्तनांच्या कर्करोगाचा काही संबंध असतो का?
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेताय? तर हे नक्की वाचा!
पुढे 1907मध्ये प्रसिद्ध फॅशन मॅगजिन ‘वोग’ने केलेल्या ब्राच्या जाहिरातीमुळे ब्रा ही वादाचे कारण बनली. पण हा वाद जास्त काळ टिकला नाही. यानंतर 1913 मध्ये मेरी फेल्प्स नावाच्या एका प्रसिद्ध व्यक्तीने रेशमचा रुमाल आणि रिबन वापरून स्वत:साठी ब्रा तयार केली. 1914मध्ये त्यांना यासाठीचा पेटंटही मिळाले होत. पुढे अमेरिकेतील डिझायनर आइडा रोजेंथल यांना 1921मध्ये वेगवेगळ्या साईजची ब्रा बनवण्याची कल्पना सुचली होती. आणि तिच कल्पना पुढे अमलात 1930मध्ये आल्यानंतर जगभरात ब्रा तयार होऊ लागल्या.
समाजात ब्राला नेहमी स्त्रियांच्या लैंगिकतेशी जोडले जाते. सर्वसाधारपणे कपडे म्हणून ब्रा कडे कधीच पाहिले जात नाही. ब्रा बदलची समाजाच्या मनात तयार झालेली दृढ भावना ही अजून तशीच असल्याचे आपल्याला नेहमी दिसून येते. ते मग कंगना राणौतच्या ‘क्वीन’ चित्रपटात सेन्सॉर बोर्डानं एका सीनमध्ये ब्राला ब्लर करायला सांगिलेले असो किंवा मुलींनी प्लीज त्वचेच्या रंगाची ब्रा घालावी असा विद्यालयाने दिलेला आदेश असो.
परंतु बदलत्या काळानुसार या दृढ भावना बदलणे देखील गरजेच्या आहे. स्त्रियांच्या कपड्यांकडे न पाहता स्त्रियांच्या कर्तृत्वाकडे पाहण्याची जास्त गरज आहे.