मुंबई | करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात यंदा फटाक्यांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आरोग्य विभागाने याबाबत प्रस्ताव तयार केला असून तो आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. फटाकेमुक्त दिवाळीसाठी आपण आग्रही असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
देशात प्रदूषणाचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने दिवाळीला फटाके फोडण्याची परवानगी द्यावी की न द्यावी याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. दिल्लीसह देशातील राज्ये आपापले म्हणणे ही न्यायाधीकरणापुढे मांडणार आहेत. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत या वर्षी दिवाळीला फटाके फोडण्याची परवानगी नसेल, असे दिल्ली सरकारने जाहीर केले आहे.
आगामी दिवाळी सण कोरोनाची स्थिती लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
राज्य मंत्रिमंडळात याबाबत चर्चा झाल्यास राजस्थान, ओरिसा आणि सिक्कीम पाठोपाठ महाराष्ट्रात दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली जाऊ शकते. फटाक्यांच्या धुरामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात, थंडीमुळे हे वायू वर जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे श्वसनाला अधिक जास्त बाधा निर्माण होऊ शकते.” त्यामुळे ही दिवाळी आपल्याला कशाप्रकारे प्रदूषण मुक्त करता येईल याची मानसिकता ठेवण गरजेचं आहे असे राजेश टोपे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या – “कोणीही बाहुबलीने रस्त्यावर येऊन आंदोलन करुन दाखवावं! राजू शेट्टींचा विरोधकांना इशारा
अर्णब प्रकरणावरून राजु शेट्टी भडकले! म्हणाले…