सध्याचं राजकीय वातावरण वेगळ्याच स्तरावर गेलं असताना मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी मंदिरांबाबत मत व्यक्त करत राज्य सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर गुटखाबंदी बाबत देखील ते ट्विट करून ते बोलले आहेत. याबाबत त्यांनी आज तीन ते चार ट्विट करून टीका केली आहेत.
केंद्र सरकारने गुटखा ची निर्मिती व विक्रीवर संपूर्ण देशात बंदी आणावी कारण महाराष्ट्र सारख्या राज्यात गुटखा विक्रीची बंदी असतांना देखील दुसऱ्या राज्यातून अनेक मार्गांद्वारे येऊन तो सहजरित्या उपलब्ध होतो.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) November 6, 2020
मंदिराचा मुद्दा
यामध्ये एका ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, “पुनःश्च हरी ॐ म्हणता व “हरी” ला च कोंडून ठेवता. बार उघडले, मग बार ची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्स ला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क (Logic) असावा या मागे हे कोडेच आहे.
हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबंधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे.”
गुटखाबंदी
त्याचबरोबर त्यांनी अवैध गुटखा आणि त्याच सेवन यावर देखील ट्विट केलं आहे. गुटखा बंद झाला असला तरी अवैध मार्गांनी गुटखा येत आहे. यावर देखील बंदी आणण्याची मागणी नांदगावकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या – परदेशी नागरिक आता भारतातून चीनमध्ये जाऊ शकणार नाहीत -चीन
आंध्रप्रदेशात शाळा सुरु करताच ५७५ विद्यार्थी आणि ८२९ शिक्षकांना कोरोनाची लागण!
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई सोमवारपासून खात्यात जमा होणार -विजय वडेट्टीवार