आयपीएल हंगाम शेटवचा टप्पात आला आहे. आज ६ प्ले ऑफचा दुसरा सामना आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघात हा एलिमिनेटर सामना आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासोबत खेळणार. आणि पराभूत संघ या सपर्धेतून बाहेर होईल.
आयपीएलच्या पॉइंट टेबल मध्ये पहिल्या तीन स्थानावर मुंबई, दिल्ली आणि बंगलोर हे तीन संघ होते. चौथ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स संघ होता. आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात हैद्राबाद संघाने मुंबईला पराभूत करून पॉइंट टेबल मध्ये चौथे स्थान मिळवले. यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघ स्पर्धेतून बाहेर पडला. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि हैद्राबाद हे पहिले चार संघ क्वालिफायरमध्ये आले.
हैदराबादची गोलंदाजी आणि फलंदाजी या हंगामात मजबूत आहे. कर्णधार डेविड वॉर्नर पण उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. या संघात संदीप शर्मा, जेसन होल्डर, शाहबाज नदीम, टी नटराजन आणि रशिद खान हे जबरदस्त गोलंदाज आहेत.
बेंगलोर संघाला खेळाच्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. बंगलोरचे अनुभवी फलंदाज फ्लॉप ठरत आहेत. कर्णधार विराट कोहली आणि स्फोटक फलंदाज एबी डिविलियर्स या दोघांनाही उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल हे दोन फिरकी गोलंदाज या संघासाठी फायदेशीर असतील.
बेंगलोर संघ आतापर्यंत ३ वेळा आयपीएल फायनलमध्ये पोहचला आहे. मात्र बंगलोर संघाला अजून एकदाही विजेतेपदं मिळवता आलं नाही. आजच्या सामन्यात दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील असतील. हा सामना दोन्ही संघासाठी करो या मरो परिस्थितीतला आहे.
महत्वाच्या बातम्या – महिला टी-२० स्पर्धेत कोण बाजी मारणार?
ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्या प्रकरणी विराट आणि सौरव गांगुलीला कोर्टाची नोटीस!
IPL: मुंबईचा सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश…
त्या दिवशी विराट वडीलांच्या अंत्यसंस्काराला गेला नाही, पण मैदानात उतरला आणि…